खाकीसाठी राखी – नारीविश्वाचा उपक्रम
सदैव ” ऑन ड्युटी ” असलेल्या पोलीस बांधवाना महत्वाचे सण देखील साजरे करता येत नाहीत. आज रक्षाबंधनादिवशीही अनेक पोलीस ड्युटीवर होते. अशा खाकी वर्दीसाठी नारीविष तर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजन केले गेले, नारीविश्व च्या सदस्यांनी भगिनी नात्याने पोलीस ठाण्यात जाऊन आणि रस्त्यावर वाहतूक पोलिसांना ओवाळून राख्या बांधल्या.
महिलांना उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन आणि त्यांची आधुनिक पद्धतीने जाहिरात करून त्यांच्या व्यवसायात वाढ करण्याचे काम नारीविश्व करत असते. याच बरोबर नवनवीन सामाजिक उपक्रम हि नेहमी राबवले जातात. आज रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलीस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत हे ओळखून नारीविश्व ने पोलीसदादांना राखी बांधण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. पोलिसदादानी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. पोलीस ठाण्याबरोबर रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले.
एकवेळी नारीविश्वाच्या संचालिका सौ. शीतल कुलकर्णी, अस्मिता पत्की, रोहिणी कुलकर्णी, श्वेता पाटील, प्रियांका मोहिते, जयश्री फडणीस, वैष्णवी बक्षी या उपस्थित होत्या.