मोफत हास्ययोग कार्यशाळा(Free Laughter Yoga Workshop)

आज गुरुवार दिनांक १० जानेवारी – नारीविश्व व सांगली जिल्हा हास्य योग्य समन्वय समिती आयोजित “मोफत हास्ययोग कार्यशाळा” खूप उत्साहात आनंदात पार पडली. नारीविश्वच्या नवीन वर्षाच्या उपक्रमास खूप छान सुरुवात झाली. या कार्यशाळेत ३०० ते ३५० नागरिक उपस्थित होते. नगरसेवक कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार आणि नवलाई हे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते . तसेच सांगली जिल्यातील प्रत्येक हास्यक्लब चे अध्यक्ष व सर्व हास्यक्लब मेंबर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. मुकुंद उदगावकर, ओस्तवाल, पुरोहित व पाटील यांनीही मदत केली. यामध्ये नारीविश्व मेंबर व सांगली जिल्हा हास्ययोग्य समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ. जया जोशी यांनी हास्याचे फायदे व काही उपयुक्त अशी हास्ययोग करून दाखवले व माहिती दिली. तसेच नारीविश्व संचालिका सौ. शितल कुलकर्णी यांनी नारीविश्व राबवत असलेल्या प्रत्येक महिन्याच्या मोफत कार्यशाळेबद्दल माहिती दिली व महिलांनी होणाऱ्या प्रत्येक मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे. चहा व बिस्किटांच्या गोडव्याने नारीविश्व मोफत हास्ययोग कार्यशाळा संपन्न झाली.

 

previous arrow
next arrow
Slider
  •  
  •  
  •  
  •  
  •   
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp chat