Anagha Marriage Councellor & Astrologer -Pune

आजही मुलामुलींचे विवाह ठरविणे ही बहुतांशी पालकांच्या अखन्यारीतील बाब समजली जाते.मुळात विवाह ही गोष्ट वैयक्तिक नसून ती कौटूबिंक व सामाजिक जास्त आहे आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीचे भान येण्यासाठी आवश्यकता निर्माण झाली ती विवाह समुपदेशनाची. पण समुपदेशन ही अशी काही गोष्ट आपल्याला रूढी व परंपरागत समाजात सहजासहजी मान्य होऊन ती स्वीकारली जाण्यासारखी नाही.पण तरी नेमक आपल काम आणि कुठ चुकतय ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या घटकांचा विचार करायचा आहे ही या लेखनमार्गचा उददेश –

विवाह समुपदेशनाचा अर्थ काय ? आणि त्याची आवश्याकता आहे काय ? तर हो विवाहास उत्सुक आसणारे बहुतेक लोक वैवाहिक जीवनाची काहीच तयारी करीत नाहीत.ते फक्त विवाह संभारंभाची तयारी करतात .

  • विवाहाची तयारी करणे आपल्या जोडीदाराशी अत्यंत जवळकीचे सबंध प्रस्थापित होतात तसे कोणत्याही स्त्री-पुरुषांच्या नात्यात होत नाहीत.
  • जोडीदारबरोबर चांगले संबध निर्माण होऊन ते टिकवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य क्षमता लक्षात घेऊन त्याच्या मर्यादा जाणून घेणे.
  • जोडीदारीची निवड ही व्यक्तिमतावर की भावनिकतेवर अवलंबून असावी हे ठरविणे.
  • विवाहनंतर सुरु होणाऱ्या स्वतःच्या नव्या भूमिका आणित्याबाबत झालेले विचार ,अभिव्यक्ती समजून घेणे

अशा अनेक आचारविचारांची देवाणघेवाण आपण आपल्या या संवादाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि सोयारीक जुळवताना आपल्या जोडीदाराच्या मनाशी आपल्या मनाचे सूर जुळतील यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

सौ.अनघा साठे.
समुपदेशक

 

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat