Brahmin Media Unity Creates Power

ब्राह्मण एकते विषयी थोडेसे
१) कोणी कितीही संघटना काढोत प्रत्येकाने एका प्रमुख संघटनेकडे त्याची नोंद करावी.
२) आपल्या वाडीतील, गावातील, शहरातील प्रत्येक समाज बांधव हा महिन्यात कोणत्या ना कोणत्या प्रसंगाने एकत्र येईल असा विचार असावा.
३) धनी, उद्योगपती अश्या ब्राह्मण लोकांनी आपण आपल्या समाजाला कसा उपयोगी पडतो किंवा पडू शकतो याचा विचार करून आचरण करावे.
४) समाजातील गरीब व्यक्तींनी आपला समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार करून आचरण करावे.
५) माध्यम वर्गीय समाजबांधवांनी आठवड्यातील निदान २ तासाचा वेळ समाज साठी द्यावा त्यात आपण काय करू शकतो हे स्वतः ठरवावे.
६) समाजातील प्रत्येक व्यक्ती कसा एकत्र येईल त्यासाठी काय काय करू शकतो याची प्रत्येकानी नोंद करावी, आणि कोणत्या ना कोणत्या जमेल त्या ( आवडीनुसार ) कार्यक्रमाचे आयोजन करून प्रत्येकाने नेतृत्व करावे.
७) आपला समाज बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, व्यावसायिक, औद्योगिक, तांत्रिक, शैक्षणिक इ. क्षेत्रात कसा अव्व्ल होईल या साठी प्रयत्न करावेत आणि त्याची नोंद करावी.
८) प्रत्येक गावात निदान एक तरी ब्राह्मण व्यायाम शाळा असावी जिथे सर्व समाजबांधव एकत्र येऊन शक्तीची उपासना करू शकतील
९) दर महिन्याला आपल्या सभोवतालच्या घडामोडीबद्दल विचार देवाण घेवाण करण्यासाठी एका ठिकाणी बैठक घ्यावी. आणि त्याचा वृत्तांत प्रमुख संस्थेला सादर करावा.
१०) समाजातील निराधार वयोवृद्ध लोकांसाठी प्रत्येक गावाच्या ठिकाणी एक केंद्र स्थापन करावे व त्याची नोंद प्रमुख संस्थेला करावी.
११) नवी पिढी अशी सुसंस्कृत होईल याकडे प्रत्येकानी स्वतः काय करता येईल याची कल्पना मांडावी आणि ती सत्यात कशी उतरवता येईल या साठी सतत प्रयत्न करावेत.
१२) चांगले वक्तृत्व निर्माण होण्यासाठी सर्व वयोगटासाठी स्पर्धा आयोजित कराव्यात.
१३) आपल्या समाजातील जे लोक शेती करतात त्याच्याकडून जास्तीत जास्त कशी खरेदी करता येईल याची संधी शोधावी. आणि घरच्या शेतीला प्रामुख्याने प्राधान्य द्यावे.
१४) समाजातील प्रतिष्टीत व्यक्तींना योग्य मन सन्मान द्यावा.
१५) एकत्र कुटूंब पद्धत अंगीकारावी.
१६) आपल्या कुलदैवताला जाताना एक कुलदैवत असलेल्या बांधवानी सहल आयोजित करून एकत्र प्रवास करावा.
१७) दुःख प्रसंगी कोणताही वैरभाव असेल तर तो विसरून एकत्र येऊन त्या कुटूंबाचे सांत्वन करावे.
१८) आपल्या समाजातील बऱ्याच लोकांकडे छोटे मोठे मंगल कार्यालय आहे त्याचा समाज बांधवाना कसा उपयोग करून देता येईल यावर विचार करावा.
१९) समाज बांधव म्हणून काही फ्री मिळेल याची अपेक्षा करण्यापेक्षा आपल्या आर्थिक कुवतीनुसार प्रत्येक समाजबांधवाने तन, मन धनाने सहभाग घ्यावा आणि समाज सेवा करावी.
२०) वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींनी आपल्या समाजासाठी काही योगदान देता येईल का याचा नक्की विचार करावा. आणि समाजाने देखील त्याची दाखल घेऊन त्यांना योग्य ती मदत करावी.
२१) समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अकारण पोलीस कारवाई होत असेल तर योग्य तो विचार करून त्याला मदत करावी.
२२) समाजातील तरुणींनी समाजाबाहेर लग्न करू नये म्हणून स्वतः पालकांनी आणि नंबर समाजानी जबाबदारी घेतली पाहिजे त्यासाठी विचारमंथन झालेच पाहिजे.

या व अश्या अनेक गोष्टी आपण करू शकतो यासाठी प्रत्येक गोष्टीची नोंद घेण्यासाठी आणि माहिती प्रसार करण्यासाठी आम्ही एक वेबसाईट ची नोंदणी करत आहोत. यासाठी २४ तास काम करण्यासाठी ब्राह्मण साहाय्य केंद्र पण करण्याचा विचार आहे ज्यामध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्त करण्याची मनीषा आहे ज्यामुळे आपण सारे सतत एकत्र येऊ शकू आणि आपण आपले कुटुंब, समाज आणि आपला देश अधिक बळकट करू शकू असे मला वाटते.

मी विनायक कुलकर्णी सध्या पुण्यात नोकरीला आहे आणि सांगली माझे मुळगाव आहे. मला आपल्या समाजासाठी खूप काम करण्याची इच्या आहे. मी शनिवार रविवार हे दोन दिवस देऊ शकतो आणि आपल्या समाजाची साथ मिळाली तर जास्तीत जास्त काम करू शकतो.

सध्या माझ्या सौ. शीतल कुलकर्णी ह्या सांगलीतून महिला एकत्रीकरणासाठी “नारीविश्व . कॉम” www.narivishaw.com हे वेब पोर्टल चालवतात. आमचा मागील तीन वर्ष ह्या क्षेत्रांत अनुभव आहे.
जर संधी मिळाली तर माझी संपूर्ण वेळ आपल्या समाजासाठी कार्पोरेट पद्धतीने काम करण्याची तयारी आहे. वरील लिहिलेल्या मुद्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी आपण कश्या साध्य करू शकतो यावर मी प्रयत्न करू शकतो.
मला तुमची साथ हवी आहे….

यासाठी मी “ब्राह्मण मीडिया” स्वरूपात काम करू शकतो, ज्यामध्ये समाजातील प्रत्येक केल्या गेलेल्या कार्याची नोंद होईल आणि कोठे काय चालले आहे याची माहिती सर्वाना मिळेल.
त्यासाठी आपण फक्त ठराविक वार्षिक वर्गणी देऊन सभासद होऊ शकता आणि आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता, आणि विविध कार्यक्रमात भाग घेऊन सहभागी होऊ शकता व जागतिक स्थरावर आपण आपले कार्य करू शकतो आणि आपला समाज सर्व स्थरातून पुढे घेऊन जाऊ शकतो..

आपल्याला हि आमची कल्पना आवडली असेल तर कृपया माझ्या ( ७०२८०२६५६७ ) ह्या व्हॉट्सअप नंबर वर आपण कसा हातभार लावू शकता ते कळवावे.

  •  
  •  
  •  
  •  
  •   
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp chat