Eco-Friendly Gauri Ganpati Decoration Competition

श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करतात. मात्र त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत ‘इको फ्रेंडली गौरी गणपती सजावट स्पर्धा’! या माध्यमातून तुम्हाला तुमची इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. चला तर मग, प्रबोधनाचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया! इको फ्रेंडली गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.

ज्या स्पर्धकांच्याकडे गौरी बसवण्याची प्रथा नसेल ते सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

यासाठी खालील मुद्दे पाहा.

– शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती

– प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट

– विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावं?
– आमच्या ९१५६३३९७९४ या व्हॉट्सअँप नंबरवर किंवा narivishwa@gmail.com आयडीवर खालील माहिती पाठवा

– तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवा

– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे?

– ३ ते ४ मिनिटाचा व्हीडिओ ज्यात आपले संपूर्ण नाव व गाव , तुम्ही कश्या प्रकारे डेकोरेशन केले आहे आपला संदेश आणि १ डिजिटल फोटो (सेल्फी)

ज्या गौरी-गणपती सजावटीला सर्वाधिक वोट / लाईक, तो ठरणार विजेता!

– तुम्ही दिलेली माहिती आम्ही www.narivishwa.com या वेबसाईटवर अपलोड करु.

– त्यानंतर त्याची पोस्ट नारीविश्वच्या वेबसाईट, फेसबुक,इन्स्टाग्रामवर आणि युट्युब शेअर केली जाईल.

– तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हालाही त्यात टॅग केले जाईल.

– परीक्षकांचा निर्णय अंतिम निर्णय असेल.

फोटो आणि व्हिडीओ आम्हाला पाठवायची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२० राहील त्यानंतर आलेला फोटो आणि व्हिडीओ स्वीकारला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat