Narivishwa Ganpati Festival Event

दिनांक ५ सप्टेंबर , नारीविश्व हि संस्था महिलांना त्याच्या व्यवसायात, त्याच्या व्यवसाय वाढीसाठी खास वेगवेगळया प्रकाराने त्यांचा व्यवसाय वाढीचे उपक्रम आणि आधुनिक डिजिटल पद्धतीने त्यांच्या वाढीचे प्रयत्न करण्याचे काम करत असते.

गणपती उत्सव जवळ आल्याने महिलांसाठी खास कार्यशाळा आयोजित केली होती या मध्ये महिलांसाठी विविध कलात्मक गोष्टींची निर्मिती करून आपला गणपती उत्सव कसा साजरा करता येऊ शकतो याची माहिती देण्यात आली, कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपले कौशल्य सादर केले यामध्ये पाक कला तज्ज्ञ सौ. अपर्णा पेंडुरकर, यांनी उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक कसे करावेत याचे प्रात्यक्षिक दाखवले, सौ सुप्रिया जोशी यांनी गणपती साठी पर्यावरण पूरक मखर कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक दाखवले, सौ अपर्ण देशपांडे यांनी तरंगणाऱ्या पणत्या आणि उदबत्ती घर कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले याच बरोबर अपर्णा कानेगावकर यांनी टप्परवेअर बद्दल माहिती देऊन खमंग ढोकळा कसा बनवणं हे पण शिकवले, या कार्यक्रमाला नगरसेविका सौ उर्मिला बेलवलकर आणि माजी नगरसेविका सौ आशाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, यावेळी बोलताना सौ. उर्मिलाताई बेलवलकर यांनी नारीविश्वाच्या या कार्यशाळेला शुभेच्या दिल्या आणि नारीविश्व या संस्थेला भावी काळात अश्या समाज उपयोगी उपक्रमांना सर्व प्रकारे साहाय्य करू असे आश्वासन दिले, आणि सांगलीच्या जागरूक महिलांनी या कार्यक्रमाला दिलेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला, नारीविश्वाच्या संचालिका सौ शीतल कुलकर्णी यांनी महिलांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार मानले आणि नारीविश्व च्या पुढील नवरात्रीच्या कार्यक्रमाबद्दल घोषणा केली. याच बरोबर महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याचा व्यवसाय वाढावा म्हणून नारीविश्व डिजिटल कार्ड ची घोषणा केली आणि कार्यक्रमाच्या शेवटी गणपतीची आरती करून प्रसाद वाटप केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

previous arrow
next arrow
Slider

 

  •  
  •  
  •  
  •  
  •   
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp chat